
TOP STORIES
माझ्या भिवंडीचा गुढ़ी पाड़वा
22/03/2023

गुढ़ी पाड़वा हा सण भारतातच नाहीं तर संपूर्ण जगात हर्ष उल्हासात साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीचे स्वरूप दर्शवीणार्या या सणात घरों घरी गुढ़ी उभारण्यात येते. या पारंपारिक सणात बहुतांश शहरात पहाटेच्या सुमारास शोभा यात्रा काढ़ली जाते. भिवंडी शहरातही बर्याच वर्षा पासुन अशी शोभा यात्रा काढ़ण्यात येत. यात भिवंडीतील नागरिक ढोल टाशां पासुन ते पारंपारिक वेशभूषेत मोठया संखेने आपली उपस्थिति दर्शवितात. आपल्या कुणबी समाजाच्या दृष्टिकोणातून ही शोभा यात्रा महत्वाची अशी की मागिल गेल्या दोन वर्षा पासुन आपल्या समाजा तर्फ़े या शोभा यात्रेत मोलाचा वाटा असावा म्हणुन, यात सहभागी होणार्या सर्व समाज बांधवांसाठी पारंपारिक दृष्टिने प्रेरित सेल्फ़ी पॉईंट उभारण्यात येत आहे. या आपल्या उपक्रमा मुळे आज भिवंडीत कुणबी समाजाला नामलौकिक स्थान मिळाले आहे ही एक कुणबी समाज बांधव म्हणुन गर्वाची बाब आहे.
उच्च शिक्षित पदविधर सत्कार, विद्यार्थ्यांचे गुणगौरव व पुस्तके वाटप
“The roots of education are bitter,
but the fruit is sweet.”
3/22/2023




