कुणबी समाजा तर्फ़े आपल्या कुणबी बांधवांसाठी दिवाळी पहाटचे आयोजन
26/10/2022
कुणबी समाज भिवंडी शहर एक नवीन संकल्पना सादर करीत आहे. हिन्दु धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे.त्याची दखल घेत आपण सर्व कुणबी समाज एक व्यासपीठावर संघटीत कसा होईल या विचार धारणेतून दीपावली पहाट म्हणजे बळी पहाट एक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले गेले कुणबी समाज भिवंडी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि कार्यकारिणी यांनी भरपूर मेहनत घेऊन जास्तीत जास्त समाज बांधव. सदर कार्यक्रमात सहभागी होतील याची विशेष काळजी घेण्यात आली.
समाज बांधव याचा उस्फूर्त सहभाग हे उल्लेखनीय होते.सदर कार्यक्रमात दीपावली च्या आनंदात भर पडावी म्हणून अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ यांनी एक संकल्पना केली लाँटरी पद्धतीने कार्यक्रमात उपस्थित समाज बांधव यांना एक कुंपण देण्यात आले .त्यातुन ज्या समाज बांधवाचा क्रमांक येत होता त्या दीपावली ची आपल्या समाजा कङून भेट वस्तूचे वाटप करण्यात येत होते.अश्या प्रकारे एक आनंद जोष.उत्सवाचा वातावरणात दीपावली पहाट कुणबी समाज भिवंडी शहर दीपावली सण साजरा करतो आणि त्याला सर्व समाज बांधव अंतःकरणातुन सहकार्य करतात हिच सामाजिक बांधिलकीची विचार धारा आहे.