कुणबी समाजातिल महिलांसाठी हल्दी कूंकु चे आयोजन करण्यात आले

21/02/2022

कुणबी समाज एक सामाजिक बांधिलकीतून समाजातील माता भगिनी यांचा कार्यक्रम म्हणजे हळदीकुंकू हा महिला वर्गा साठी समाजकार्याची विचार धारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येतो. आपल्या समाजातील काही नविन कुंटूबे किंवा नव वधू हिचा आपल्या कुणबी समाज भिवंडीतील माता, भगिनी, यांच्याशी समाजीक स्तरावर कसा संपर्क वाढेल असा हा खास महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे महिला कार्यकारिणी आयोजन आणि नियोजन करते.

या कार्यक्रमाचे अवचित लक्षात घेऊन सध्या महिला संघटीत होऊन मोठ्या प्रमाणात बचत गटाची निमित्ती करून समाजाच्या आर्थिक स्त्रोत कसा वाढेल जेणेकरून आम्ही महिलांचा कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात सादरीकरण करू शकतो तसेच महिलांसाठी वधूवर सुचक मेळाव्याचे व महिलांसाठी वैद्यकीय कँप चे आयोजन आणि इतर बरेच असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन हे फक्त हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून साकारता येऊ शकते आणि कुणबी समाज भिवंडी एक सुजलाम सुफलाम समाज आपण स्त्री च्या माध्यमातून निर्माण करू शकतो, म्हणून नवनिर्वाचित कार्यकारिणी अध्यक्षांनी माता आणि भगिनी यांना सुचित केले आहे आपण महिलांचे इतर सामाजिक कार्यक्रमाची रुपरेषा तयार करण्यात यावे जेणेकरून करून इतर समाजाचे लोकांपर्यंत आपले समाजाचे सामाजिक काम पोचले पाहिजे म्हणजे खरे अर्थानी सांगता येईल आणि हिच खरी पावती आपल्या समाजाला प्रेरणा देऊन जाईल.

Scroll to Top