माझ्या भिवंडीचा गुढी पाड़वा, शोभा यात्रेत कुणबी समाजाचे विशेष योगदान

22/03/2023

एक सामाजिक परंपरा जपणारा सण म्हणजे गुढीपाडव्याची निर्मिती ब्रम्हदेवाने केली विश्र्वनिर्मिती ब्रम्हदेवाने सुष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रम्हदेवाने विश्र्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे " सत्य- युगाची " सुरवात झाली आणि म्हणूनच नुतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो.महापर्वाच्या अथार्त नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण" गुढीपाडवा" म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून सकाळी पहाटे प्रभात फेरी आयोजन करून विजयी मिरवणूक काढण्यात येते.

तसेच घराच्या अंगणात गुढी उभारून शास्त्र शुध्द पध्दतीने गुढीची पुजा केली जाते चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभु रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता. म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभु रामाने वाढीचा वध करून त्याचा छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजयोत्सवाचा दिवस म्हणजे " गुढीपाडवा" या सोने च्या दिवशी कुणबी समाज आणि इतर समाजातील नागरिकाचा मोठ्या संख्येत सहभाग सकाळच्या प्रभात फेरीत असतो सर्व नागरिक आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी असतात या मध्ये भिवंडीतील बरीच डोल पथक मडळाचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात एक आनंद मय वातावरणात प्रभात फेरी काढली जाते परतुन आताच्या नवलाईला सेल्फी पोईटची आवड लक्षात घेता.कुणबी समाज भिवंडी शहर यांची दखल घेऊन दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन छत्रपती शिवाजीमहाराज चौक येथे सेल्फी पोईटची उभारणी करून सर्व समाजातील नागरिकांकडून चागले प्रकारे प्रतिसाद मिळतो असे काही वेगळे करण्याची आवडी मुले प्रत्येकाच्या मनामध्ये कुणबी समाज भिवंडीची अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंडळाने आपल्या कार्याची छबी उमटविली आहे मग ती छत्रपती शिवाजीमहाराजची जयंती असो कि गुढीपाडवा असो कुणबी समाज भिवंडीची सहभाग असणार यात तिळ मात्र शंका नाही

Scroll to Top