भिवंडीतील छत्रपति शिवाजी महाराज जयंती मोठया जल्लोशात साज़री
19/12/2023
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कुणबी समाजाचे प्रेरणा स्थान छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती म्हणजे जणू एक महाराष्ट्रासाठी उत्सव आणि कुणबी समाजा साठी तर राजे पुन्हा एकदा या महाराष्ट्र भूमीवर जन्माला आल्या प्रमाणे तो उत्साह त्याच जोषात सर्व वातावरण भगव मय पोवाडे आवाजाने संपुर्ण महाराष्ट्र शिवमय होते. कुणबी समाजाचे मावळे मोठ्या प्रमाणात होते.इतिहास असे सांगतो की छत्रपती शिवाजीमहाराज कुलवाङी ( कुणबी) रयतेचे राजे होते. त्या मुळे शेतीची कामे करून नंतर स्वराज्य साठी कोकण पट्टय़ातुन छत्रपतींच्या छत्र छायेखाली स्वराज्य चे तोरण बांधणीला कुणबी समाजाचा मावळे आपल्या राज्या साठी जिवाची पर्वा न करता प्राणांची आहुती राजे च्या एका शब्दावर देत होते.
कुणबी समाजाची मावळेची राज्यांच्या बाबतीत एक वेगळी निष्ठा होती. दिलेले काम चोख पद्धतीने कसे पार पडेल आणि वेळ आलीच तर जिवाला जिव देणारे कोकण प्रांतातील मावळे होते.अश्या माझ्या राजेची जयंती आज भिवंडी शहरात उत्सवात कुणबी समाज भिवंडी साजरी करतो.भिवंडीतील शुभाष गार्डन ते छत्रपती शिवाजीमहाराज चौक या ठिकाणी इतिहासकालीन महाराजांचे छायाचित्रांची उभारणी करून भिवंडीचे वातावरण भक्ति मय आणि शिव मय होते. कुणबी समाजाच्या सजावटीची दखल अनेक सामाजिक संस्था व भिवंडीकर नागरिक आणि राजकीय पक्ष जातीने दखल घेतात याचे समाधान कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ पुन्हा त्याच जोषात छत्रपतींच्या जयंतीची वाट पाहतात आम्हाला आमच्या राजे साठी काहीतरी कराची भावणा निर्माण होते.