धावण्याच्या शर्यतित योगदान देण्यासाठी कुणबी समाज अग्रेसर
26/01/2022
आजादी का अमृत महोत्सव दौङ २०२२
२६ जानेवारी २०२२ रोजी एक ऐतिहासिक वाटचाली कङे प्रस्तान करत पोलीस आयुक्त ठाणे परिमंड २ भिवंडी यांचे सहकार्यातून भिवंडी शहरातील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थीनी.नागरिक.यांनी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दौङ हि धावणेची स्पर्धा मध्ये सर्व भिवंडी कर यांनी सहभाग घेतला होता. त्या अनुशंगाने कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ यांनी राष्ट्रीय कामात आपले योगदान दिले. तसेच कुणबी समाजाच्या वतीने धर्मवीर आनंद दिधे चौक येथे सदर आजादी का अमृत महोत्सव दौङ कार्यक्रमाचा नामफलक लावून स्टेज करण्यात आले होते. धावणारे प्रतेक खेळाडूचे मनोबल वाढविणेच्या दृष्टी कोनातून टाळ्या वाजवून आणि स्पीकर वर मनोबल वाढविण्या साठी घोषवाक्य प्रोत्साहन देत खेळाडूंचे स्वागत करण्यात येत होते आणि प्रत्येक खेळाडूस पिण्याचे पाणी.फ्रूटी.तसेच वैधकीय सेवा देण्याचे कार्य कुणबी समाज भिवंडी तर्फे करण्यात आले सदरची दौड हि परशुराम टावरे स्टेडियम पासून ते वंजारपट्टी नाक्याला वळसा घालत परत परशुराम टावरे स्टेडियम येथे समारोप करण्यात आला. सदर स्पर्धेत चार ते पाच हजार खेळाडू यांनी सहभाग घेतला होता.
तसेच विजेत्या खेळाडूस सन्मानित करण्यात आले. अश्या काही राष्ट्रीय कामात हिरीरीने कुणबी समाज भिवंडी सहभागी होऊन मानवसेवा म्हणजे ईश्वरी पूजेचा दृष्टीकोन लक्षात घेऊन आपले समाजीक आणि राष्ट्रीय काम कुणबी समाज भिवंडी शहर कार्यशील असतो.या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुशंगाने मी अध्यक्ष आणि माझी कार्यकारिणी सदस्य आपणास पुढील अश्या कार्यक्रमात आपण सहभागी होऊन समाजीक कार्यात आणि राष्ट्रीय कामात सहकार्य आपणा कङून अपेक्षित आहे.