आपल्या मनात निर्माण झालेला एक प्रश्न किंवा आपल्या समाजाबद्दल असलेली एक विचारधारा ** समाज एक विचार धारा आहे.प्रत्येक भारतीय नागरिक हा समाजाशी जोडला गेला आहे.ज्याची जगण्याची जीवनशैलीत अलिप्त असते असे नागरिक समाजाशिवाय जगू शकत नाही.कारण समाज्याची संकल्पना हजारो वर्षांपासून पासून कार्यान्वित आहे.पुर्वी लोक संघटीत राहणीमान असायचे वाङ्या. पाङे.नंतर ब्रिटिश काळा मध्ये महसूल गांवाची नांवे जन्माला आली ती गांवा नुसार शेतसारा वसुल करण्या साठी याच कार्यप्रणालीतुन समाजाची निर्मिती झाली.लोक संघटीत झाले तीथे समाज तयार झाला.या परिस्थितीतून आपला कुणबी समाज नावारूपास आला .आपल्या समाज हा शेतकरीवर्ग असल्या मुळे सर्व जीवनशैली ही पावसाच्या आधारित असायची काबाडकष्ट जनुआपल्या नशीबात परमेश्वराने लिहले होते. परंतु त्याची तमा न बाळकता एक आशेच किरण आपल्या पदरी पडले आणि थोर संत महात्मे या महाराष्ट्र भुमीत जन्म घेतला त्यातील एक नांव छत्रपती शिवाजी महाराज याचे स्वप्न हे हिन्दवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा अशी शपथ घेऊन स्वराज्य तोरण बांधणीला सुरवात झाली.भल्यामोठे मुगल राजवटीत शह देण्याचे काम चोख करत असताना किती तरी मावळे.सरदार.सेनापती. यांना विर मरणाला सामोरं जाव लागले.या महान व्यक्तिमत्वा मुळे महाराष्ट्राचा उगम झाला त्या नंतर स्वातंत्र्य काळात पुन्हा म्हणुष्य जिवावर बितेल अशी वेळ आली साथीच्या रोगाने प्लेगची साथीनं ङोक वर काढले आणि हजारो लोक मृत्यु मुखी पडले त्या वेळी सदर रोगाने सळो कि पळो करून सोङले परतु नागरिकांना धीर न खचवता धैर्याने परिस्थितीशी तोंड दिले अनेक संस्थापक यांनी मदतत्तीचा हात देत नागरिकाचा जिव वाचविले यालाच म्हणतात समाज प्लेगच्या साथी नंतर मधला काळ हा ज्याचे कङे जमीन जाहीदात मालमत्ता असा वर्ग समाजा पासून दुर विखुरला जात चालला होता .परतु वरच्याने अशी परिस्थिती कोरोना मध्ये दाखवून दिली .काही येणार नाही सोबत तुझ्या खाली हाथ आया था तु .खाली हाथ. जायेगा तु म्हणून सांगतो संघटीत रहा आणि गरजवंताचा आधार बणा वेळ कोणावर येईल सांगुन येणार नाही आणि गेलेली वेळ बरच काही शिकवून गेली. याचे अताचे उदाहरण म्हणजे कोव्हाङ- 19 या काळात माणूस आणि समाज काय असतो त्याचे उदाहरण आपण जवळून पाहिले आज हि सन 2020-2021 हे वर्ष भारतीयांन साठी संघर्ष मय वर्ष होते.त्या मध्ये प्रशासकीय यंत्रणा देखील हतबल झाल्या.नागरिकाच्या जीवनशैलीत पुर्ण बदल होऊन कित्तेक निरपराध मुत्यू-मुखी पडले.परंतु त्या वेळी जे धावून आले.त्या संस्था आणि समाज आपण बोलतो समाज काय करतो .अश्या आणि बाकी परिस्थितीत उपयोगी येतो तो फक्त समाज आणि समाज बांधव.

समाज कसा असावा ?

संजय बाळाराम भगत....

SOCIAL STORIES

कुणबी समाजातिल महिलांसाठी हल्दी कूंकु चे आयोजन करण्यात आले

21/02/2022

कुणबी समाज एक सामाजिक बांधिलकीतून समाजातील माता भगिनी यांचा कार्यक्रम म्हणजे हळदीकुंकू हा महिला वर्गा साठी समाजकार्याची विचार धारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येतो. आपल्या समाजातील काही नविन कुंटूबे किंवा नव वधू हिचा आपल्या कुणबी समाज भिवंडीतील माता, भगिनी, यांच्याशी समाजीक स्तरावर कसा संपर्क वाढेल असा हा खास महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे महिला कार्यकारिणी आयोजन आणि नियोजन करते.

या कार्यक्रमाचे अवचित लक्षात घेऊन सध्या महिला संघटीत होऊन मोठ्या प्रमाणात बचत गटाची निमित्ती करून समाजाच्या आर्थिक स्त्रोत कसा वाढेल जेणेकरून आम्ही महिलांचा कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात सादरीकरण करू शकतो तसेच महिलांसाठी वधूवर सुचक मेळाव्याचे व महिलांसाठी वैद्यकीय कँप चे आयोजन आणि इतर बरेच असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन हे फक्त हळदीकुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून साकारता येऊ शकते आणि कुणबी समाज भिवंडी एक सुजलाम सुफलाम समाज आपण स्त्री च्या माध्यमातून निर्माण करू शकतो, म्हणून नवनिर्वाचित कार्यकारिणी अध्यक्षांनी माता आणि भगिनी यांना सुचित केले आहे आपण महिलांचे इतर सामाजिक कार्यक्रमाची रुपरेषा तयार करण्यात यावे जेणेकरून करून इतर समाजाचे लोकांपर्यंत आपले समाजाचे सामाजिक काम पोचले पाहिजे म्हणजे खरे अर्थानी सांगता येईल आणि हिच खरी पावती आपल्या समाजाला प्रेरणा देऊन जाईल.

धावण्याच्या शर्यतित योगदान देण्यासाठी कुणबी समाज अग्रेसर

26/01/2022

आजादी का अमृत महोत्सव दौङ २०२२ २६ जानेवारी २०२२ रोजी एक ऐतिहासिक वाटचाली कङे प्रस्तान करत पोलीस आयुक्त ठाणे परिमंड २ भिवंडी यांचे सहकार्यातून भिवंडी शहरातील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थीनी.नागरिक.यांनी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दौङ हि धावणेची स्पर्धा मध्ये सर्व भिवंडी कर यांनी सहभाग घेतला होता. त्या अनुशंगाने कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष आणि कार्यकारिणी मंङळ यांनी राष्ट्रीय कामात आपले योगदान दिले. तसेच कुणबी समाजाच्या वतीने धर्मवीर आनंद दिधे चौक येथे सदर आजादी का अमृत महोत्सव दौङ कार्यक्रमाचा नामफलक लावून स्टेज करण्यात आले होते. धावणारे प्रतेक खेळाडूचे मनोबल वाढविणेच्या दृष्टी कोनातून टाळ्या वाजवून आणि स्पीकर वर मनोबल वाढविण्या साठी घोषवाक्य प्रोत्साहन देत खेळाडूंचे स्वागत करण्यात येत होते आणि प्रत्येक खेळाडूस पिण्याचे पाणी.फ्रूटी.तसेच वैधकीय सेवा देण्याचे कार्य कुणबी समाज भिवंडी तर्फे करण्यात आले सदरची दौड हि परशुराम टावरे स्टेडियम पासून ते वंजारपट्टी नाक्याला वळसा घालत परत परशुराम टावरे स्टेडियम येथे समारोप करण्यात आला. सदर स्पर्धेत चार ते पाच हजार खेळाडू यांनी सहभाग घेतला होता.

तसेच विजेत्या खेळाडूस सन्मानित करण्यात आले. अश्या काही राष्ट्रीय कामात हिरीरीने कुणबी समाज भिवंडी सहभागी होऊन मानवसेवा म्हणजे ईश्वरी पूजेचा दृष्टीकोन लक्षात घेऊन आपले समाजीक आणि राष्ट्रीय काम कुणबी समाज भिवंडी शहर कार्यशील असतो.या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुशंगाने मी अध्यक्ष आणि माझी कार्यकारिणी सदस्य आपणास पुढील अश्या कार्यक्रमात आपण सहभागी होऊन समाजीक कार्यात आणि राष्ट्रीय कामात सहकार्य आपणा कङून अपेक्षित आहे.

Scroll to Top