EDUCATIONAL STORIES

उच्च शिक्षित पदविधर सत्कार, विद्यार्थ्यांचे गुणगौरव व पुस्तके वाटप
19/06/2022
*कुणबी समाज भिवंडी शहर तर्फे सालाबाद प्रामाणे समाजातील होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनी याचे वार्षिक परिक्षा निकाल इयत्ता १ ते १० निकाल घोषित झाल्यानंतर जे विद्यार्थी ७० % वरील गुण संपादन करतात अश्या विद्यार्थी याचे निकाल पत्राची झेरॉक्स प्रत आपल्या भिवंडी शहर समाजाचे विभाग प्रमुखा मार्फत जमा करून एकूण १५० ते २०० विद्यार्थी सालाबाद प्रमाणे सहभाग घेतात आणि त्या मध्ये उल्लेखनीय गुणाचा इगतवारी करून त्यांना शालेय वस्तू साहित्य गुणगौरवाच्या माध्यमातून आपल्या कुणबी समाज जेष्ठ समाज बांधव यांच्या कङून सन्मानित करण्यात येते.
तसेच त्या पुढील माध्यमिक आणि पदवीधर आणि त्या पुढील शिक्षण घेत असलेले आपल्या समाजाचे ङाँक्टर,इंजिनीयर, वकील, वरीष्ठ पोलीस अधिकारी पदी निवड तसेच एम.पी.सी. आणि यु.पी.सी.मधुन पास होऊन उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार अश्या उल्लेखनीय विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांची विशेष नोंद घेऊन समाजा तर्फे सन्मानीत करण्यात येते या मागचा समाजिक हेतु हा आहे की कुणबी म्हणजे ज्ञानी आणि याच शब्द बोधातुन काही विद्यार्थी यांनी ठरविले कि आम्हाला समाजानी आपल्या शालेय जीवनात जे मार्गदर्शन केले त्याचे आम्ही काहीतरी देणे करी आहोत अशी भावना त्यांच्या मनात रुजेल त्या वेळी नक्की या उपक्रमाची पावती कुणबी समाज भिवंडीला प्राप्त होईल*

स्कॉलर्शिपच्या माध्यमातुन लाभार्थिला दिलेले मानधन
16/03/2023
आपला समाज आपली बांधिलकीतून समाजातील होत करू विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांना आपल्या कुणबी समाज भिवंडी शहर या माध्यमातुन आपल्या कुणबी समाजातील होत करू विद्यार्थीनी कुमारी विजेता राजू कुळे या सध्याकाळतील गरीब, गरजवंत विद्यार्थीनीला पुढील शिक्षण घेता येत नाही. परंतु कुमारी विजेता हिची वैधकीय उच्चशिक्षणा साठी जी तळमळ चालु आहे, त्या परिस्थितीचा आढावा आपल्या कुणबी समाजाने एक हात मदतीचा या अनुषंगाने घेऊन आर्थिक मदत केली. हि बाब वंदनीय आहे या पुढे कुमारी विजया सारखी विद्यार्थीनी किंवा विद्यार्थी जे ९० टक्के किवा त्याहून जास्त टक्के प्राप्त करतात परंतु उच्चशिक्षण घेण्यास काँलेज मध्ये पैसे नसल्या कारणाने प्रवेश मिळत नाही, अश्या होत करू विद्यार्थीं साठी कुणबी समाज भिवंडी तर्फे कॉलरशिप देण्याचा मानस कुणबी समाज भिवंडी शहराचे अध्यक्ष व कमेटिच्या मार्फ़त घेण्यात आला आहे. हे सर्व कुणबी समाज बांधवानच्या सहकाऱ्यां मुळे शक्य झाले आहे.
विद्याथ्यांच्या मनातिल अनेक समस्यांच्या समाधाना साठी
व मार्गदर्शना साठी सम्पर्क साधा.
