परीक्षापूर्वी मार्गदर्शन दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी संपन्न
02/02/2025
कुणबी समाज भिवंडी शहरातर्फे दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाकडे वाटचाल करताना कुणबी समाजाचे जनक जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिकवण लाभलेला कुणबी समाज ज्ञानरूपी आपल्या दैनंदिन जीवन कार्यप्रणालीमध्ये कार्यशील असलेला समाज म्हणजेच कुणबी समाज आणि मग सुरुवात होती ती नवीन पिढी नव्याने घडवण्याची जबाबदारी हे सर्वप्रथम त्या समाजाची असते ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो कारण प्रत्येक व्यक्तीवर समाजाचा संस्कार हे नक्कीच प्रखरतेने दिसून येतात आज कुणबी समाजाची जी शासकीय अशासकीय वैद्यकीय शैक्षणिक आणि इतर व्यवहारिक अशी गुणवत्ता जन्मताच प्राप्त झालेली देणगी स्वरूपातील ही विद्वत्ता फार कमी समाजांमध्ये दिसून येते आणि त्यामुळे कुणबी समाज भिवंडी शहर आणि नवीन युवा पिढी चांगली घडविण्याचा दृष्टिकोनातून जीवनातील जल वळण दिले जाते ते वर्ष म्हणजे इयत्ता दहावीचे आणि बारावीचे मग अशा विद्यार्थ्यांसाठी कुणबी समाज सर्व समाजाला विद्यार्थ्यांना एकत्रित जमून स्वर्गीय यमुनाबाई गोपाल भेरे सभागृहात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक शिबिराचे आयोजन केले जाते यामध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिमत्व श्री प्रताप देसले सर श्री महेश सर यांच्या अनुभवाच्या शिदोरीतून आपल्या समाजाला जास्तीत जास्त चांगले देण्याचा प्रयत्न दोन्ही गुरुजनांकडून मनापासून केले जाते मग दहावीचे सहाही विषय आणि त्या विषयाचे पेपर प्रत्येक विषयाचा एक बारकाईने केलेलं विश्लेषण जास्त विद्यार्थी कुठे चुकतात आणि कशाप्रकारे चुकतात त्यात चुका डबल होऊ नये यासाठी आवर्जून एक उजळणी स्वरूपामध्ये तर ते मार्गदर्शक हे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात यावेळी 2025 सालाबाद प्रमाणे कुणबी समाज भिवंडी शहराने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स यासाठी परवा विद्यालयाचे नामांकित शिक्षक श्री योगेश प्रकाश वल्लाल सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच श्री प्रताप देसले सर यांनी आपल्या कौशल्यपूर्ण असे मार्गदर्शन करून कमी वेळामध्ये जास्त पेपर कसा सोडवला जाईल आणि जास्त जास्त बारकाईने प्रश्नांची उत्तरं लिहिली जाते याच्या टिप्पणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना देण्यात आल्या यासोबतच श्रीमती अरकल मॅडम यांनी मराठी भाषेवर किंवा बहुतांशी विद्यार्थी हे मराठीमध्ये नापास होतात आपली मायभूमी आपली मराठी जरी बोलतानी सोपी वाटत असली तरी ती लिहिताना फार किचकट असते परंतु श्रीमती अरकल मॅडम यांनी आपल्या अनुभवातून दहावीच्या विद्यार्थ्यांना मनापासून मराठी लिखाण आणि त्यावरील व्याकरण यावर कशी पकड पकडता येईल आणि प्रत्येक बारकावे मराठी भाषेतले शोधण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अनुभवाच्या माध्यमातून दिला आहे सन २०२५ दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिबिराच्या वेळी एकूण १०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग घेतला होता यामधून एकच असा प्रयत्न आहे की भिवंडीतील विद्यार्थी हा उज्वल यशाचा भागीदार व्हावा आणि त्याची कारकीर्द चांगली घडावी आणि यामधूनच समाजाचे प्रबोधन होते त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कुणबी समाजाने विद्यार्थ्यांचे उज्वल भवित्यासाठी कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ कटिबद्ध आहे
ज्ञान हमारा अभिमान है
ज्ञानी होना हमारा स्वाभिमान है