कुणबी समाज कौटुंबिक सहलीचे आयोजन करण्यात आले

26/01/2025

कुणबी समाज भिवंडी शहरातर्फे सालाबाद प्रमाणे हिवाळी सहलीचे नियोजन आणि त्याची बैठक अध्यक्ष कार्यकारी मंडळ तसेच समाजातील माता-भगिनी यांच्या समावेत स्वर्गीय यमुनाबाई गोपाल भेरे सभागृह कुणबी भवन बाजारपेठ भिवंडी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीमध्ये ठरल्यानुसार सहलीचे ठिकाण आणि इतर कार्यक्रमाचे नियोजन लक्षात घेऊन भिवंडी येथील दिघाशी गाव जवळील स्वर्गीय मनोज अनंत म्हात्रे यांचे फार्म हाऊस या ठिकाणी त्यांची पत्नी श्रीमती वैशाली मनोज म्हात्रे यांनी आपला फार्म हाऊस कुणबी समाज भिवंडी शहराच्या महिलांसाठी आणि समाज बांधवांसाठी एक दिवस विसाव्याचा आनंदाचा हर्षाचा घालवण्यासाठी विना मोबदला फार्म हाऊस उपलब्ध करून दिला यासाठी सर्व स्वीट मेहनत अध्यक्ष श्री संजय भेरे, सचिव श्री दिलीप खाने, खजिनदार श्री अविनाश काठवले यांनी दोन दिवसा अगोदरच जाऊन आपल्या सहलीचे नियोजन करण्यासाठी पुढाकार घेऊन स्टेज व्यवस्था, साऊंड व्यवस्था, लाईट व्यवस्था, बसण्यासाठी खुर्ची, आणि इतर सगळे सुविधा सुसज्ज असाव्या म्हणून आणि एक भिवंडी तालुक्यातीलच जवळची ठिकाण असल्यामुळे 26 जानेवारी 2025 या दिवशी महिला आणि समाजबांधव यांची एकत्रित दिवाळी वार्षिक सहल याची नियोजन ठरले 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस असल्यामुळे एक सुवर्ण दिवसाचं आमची तर लक्षात घेऊन सहलीला प्रवास करताना शिवाजी चौक या ठिकाणाहून सर्व माता भगिनी आणि समाज बांधव यांची एकूण सहलीच्या नोंदणी प्रमाणे १५० समाज बांधवांनी आणि माता भगिनी आणि बालगोपाळ यांचा सहभाग होता सर्वप्रथम म्हात्रे फार्म हाऊस येतेस तळावर पोहोचल्यानंतर भारत मातेचे 26 जानेवारी चे अवचित लक्षात घेऊन पूजन करण्यात आले आणि राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली आणि मग सुरुवात झाली त्या सुवर्ण क्षणांना समोर जाण्याची सर्व महिलावर्ग एकत्रितपणे २५ एकर क्षेत्र असलेलं ठिकाणावर मनमुरत आनंद घेताना एक विलक्षण आनंद त्यांच्या चेहऱ्यावर प्रखरतेने दिसून येत होता तसेच महिलांसाठी सकाळचे सत्र स्विमिंग पूल रेन डान्स संगीताच्या तालावर लयबद्ध होऊन एक वेगळा आनंद घेताना पाहायला मिळाले आणि दुपारनंतर जे समाज बांधव श्री आणि सौ किंवा दोन्ही दापत्य असतील अशा जोड्यांसाठी आणि परिवारासाठी दुपारच्या सत्रामध्ये स्विमिंग पूल आणि रेन्डन्स आयोजन करण्यात आले होते सदर कार्यस्थळी मेजवानीची रेलचेल स्वादिष्ट पदार्थ याचा स्वाद घेताना तसेच दुपारच्या वेळेमध्ये सुंदर भोजनाची व्यवस्था सहलीच्या आयोजकांनी परिपूर्णता पणे केली होती समाजबांधव पुरुषवर्गासाठी क्रिकेटचे मेसेज आयोजन करण्यात आली होते श्री संजय भेरे श्री दिलीप खाने अशा दोन टीमचे आयोजन करण्यात आले दोन्ही वेळेला श्री दिलीप खाने यांची टीम विजयी झाली आणि तदनंतर काही वेळेला महिलांनी सुद्धा आपल्या परीने क्रिकेटचा आनंद घेतला आणि मग सुरुवात झाली महिलांच्या खेळाचे आयोजनाची यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका श्रीमती नूतन मोकाशी, श्रीमती स्मिता गोर श्रीमती आदिती काठवले यांनी एक आगळीवेगळी मेहनत घेऊन सर्व महिला खेळांमध्ये भाग येतील याचे नियोजन करून सूत्रसंचालन आणि बक्षिसाची लय लूट या प्रमाणामध्ये ज्या माता भगिनींनी प्राविण्य दाखवून खेळामध्ये विजयी झाल्या त्यांचा कुणबी समाज भिवंडी शहर कार्यकारणी अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी, खजिनदार आणि कार्यकारीणी सर्व सदस्य यांच्या हातून सन्मानित करण्यात आले आणि जसे जसे खेळाचे गांभीर्य वाढत होते तसे पैठणीच्या जवळ येऊन खेळ थांबला आणि एक वेगळेच वलय पाहण्याची आणि स्पर्धेची संदीप प्राप्त झाली पैठणीच्या खेळामध्ये एकूण तीन पैठणी हे बक्षीस स्वरूपामध्ये माता भगिनी यांना देण्यात आले त्यामध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आणि मग ज्या क्षणाची सर्व कुणबी समाज माता भगिनी आणि समाज बांधव बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते तू क्षण म्हणजे आधुनिक काळाकडे कुणबी समाजाचे एक पाऊल म्हणजेच कुणबी समाज भिवंडी शहराची वेबसाईटचे लोगिन त्याच दिवशी म्हणजे 26 जानेवारी 2025 चे अवचित लक्षात घेऊन कुणबी समाजाने एक नवीन कार्यप्रणालीला सुरुवात केली सर्व समाज बांधवांनी माता-भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये खजिनदार श्री अविनाश चंद्रकांत काठवळले यांनी सदर वेबसाईट कशा पद्धतीने लॉगिन करून आपल्या कुणबी समाज भिवंडीच्या सभासद पदाचा फॉर्म कसा भरावा यासंदर्भामध्ये मार्गदर्शन केले तसेच अन्य सुविधा वेबसाईटवर कशा पद्धतीने प्राप्त होऊ शकतात जसे की विद्यार्थी वर्गांसाठी कॉलेजची यादी, आर्ट्स कॉमर्स सायन्स या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती आणि इतर समाजाच्या तर्फे वर्षभरामध्ये राबवले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमाचा शीर्ष लिखाण आणि त्यातून त्या कार्यक्रमाचे छायाचित्र हे आपल्या अवलोकनार्थ मांडण्याचा प्रयत्न कार्यकारी मंडळांनी केलेला आहे कुणबी समाज भिवंडी शहराच्या या वेबसाईटचे उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर जिथे आपले पाल्य किंवा पालक असतील ते भिवंडी मध्ये झालेल्या कार्यक्रमाचा नक्कीच तिथे बसून कार्यप्रणाली मध्ये मेसेजच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतात आणि अशाप्रकारे कुणबी समाजाचे समाजबांधवा आणि माता भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करून वातावरणामधील निर्मिती आणि एक नवीन दिशेकडे वाटचाल करताना नक्कीच कुणबी समाज बांधव माता भगिनी यांना अभिमानाची बाब वाटत होती आणि सगळ्यांचे चेहऱ्यावर एक वेगळा आनंद वाहत होता प्रत्येकाच्या शुभेच्छा आणि या शुभेच्छा च्या माध्यमातून सतत अध्यक्ष कार्यकारणी मंडळ नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांच्या समोर येण्याचा एक प्रयत्न करत असतात यामागील हेतू एकच आहे फक्त समाज आणि समाजातील समाज बांधव हे एकोप्याने आणि एका दिलाने संघटित होऊन सामाजिक कार्य प्रणालीचा कार्य करण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद नक्कीच पुढील कार्यप्रणालीसाठी प्रेरणादायी ठरतात

Scroll to Top