कुणबी समाज भिवंडी शहराची २०२५ च्या दिनदर्शिका प्रकाशनाचे अनावरण

03/01/2025

एक सामाजिक कार्य प्रणालीच्या माध्यमातून एक सुज्ञ असा प्रयत्न कुणबी समाज भिवंडी शहर अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाने घेतला तो म्हणजे आपल्या कुणबी समाज भिवंडी शहराची दिनदर्शिका प्रकाशन करायचे कारण की आपल्या कुणबी समाज भिवंडी शहराचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात आहे तसे पाहिले तर भिवंडी, वाडा, शहापूर, मुरबाड, कल्याण, ठाणे, पालघर, वसई, आणि मुंबई , या सर्व शहरांमध्ये सामाजिक कार्य प्रणाली ची ओळख व्हावी समाज प्रबोधन व्हावं सदर दिनदर्शिके मध्ये वर्षभरामध्ये कुणबी समाज भिवंडी शहर वार्षिक कार्यप्रणालीचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि संमेलनाची आयोजनाच्या तारखेला हायलाईट ( ठळक) करून एक वैशिष्ट्यपूर्णता करून ज्या समाज बांधवांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा व्यावसायिक स्वरूपाच्या जाहिराती दिले आहेत अशा जाहिराती प्रथम कुणबी समाज समाज बांधवांना प्राधान्य देऊ त्या दिनदर्शिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे तसेच कुणबी समाज भिवंडी शहराच्या कार्यप्रणालीला इतर काही समाजाचे लोकांकडून सहकार्य प्राप्त होते आणि त्या माध्यमातून त्यांच्याही जाहिराती या प्रसिद्ध केल्या जातात या वेळेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनाचे वैशिष्ट्यपूर्ण असे कार्यप्रणाली अशी की आपल्या समाजाचे काही समाज बांधवांनी जाहिरातीच्या माध्यमातून देणगी स्वरूपामध्ये रक्कम दिनदर्शिकेला जाहिरात म्हणून दिली ते अँड दिनेश्वर पाटील भिवंडी वकील संघटना अध्यक्ष भिवंडी तालुका, अँड मनजीत पाटील माझी अध्यक्ष वकील संघटना भिवंडी तालुका , अँड युवराज पाटील अँड निलेश पाटील अँड संजय पाटील अँड भोईर अशा अनेक समाज बांधवांनी सगळ्यांनी आर्थिक मदत केल्यामुळे दिनदर्शिकेच्या माध्यमातून दीपावली पहाटसारख्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्षांनी कार्यकारी मंडळाला करता आली आपल्या मूळ रकमेला कोणत्या प्रकारचे धक्का न लावता आपले कार्यक्रम आपण उपलब्ध होणाऱ्या निधीमधूनच करण्याचा मानस अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाचा सतत असतो याच दिनदर्शिका प्रकाशनाच्या माध्यमातून यावर्षीचे वर्ष तिसरे सदर कार्यक्रमाची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली या कार्यक्रमाला चिंतामणी ज्वेलर्सचे श्री रोहित गोळे उद्योजक श्री नरेश निपूरते उद्योजक अँड श्री दिनेश्वर पाटील श्री रामदास पाटील सर श्री विजय खाने समाज सेवक डॉ नितीन मोकाशी अँड श्री निलेश पाटील अँड श्री स्वप्निल भोईर आणि सर्व समाज बांधव माता भगिनी व अध्यक्ष आणि कार्य करणे मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद समाज बांधवांकडून मिळाल्याबद्दल अध्यक्ष संजय विनायक भेरे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली प्रत्येक कुणबी बांधवाच्या घरात आली का हो दिनदर्शिका, आपला समाज आपली दिनदर्शिका जय महाराष्ट्र जय कुणबी

Scroll to Top