कुणबी समाजातिल महिलांसाठी नवरात्रि उत्सवाच्या निमित्ताने डांडिया रास चे आयोजन
05/10/2024
कुणबी समाज भिवंडी शहर प्रत्येक धार्मिक सणांना एक वेगळं महत्व देत आल आहे आणि त्यातीलच एक स्त्रीवर्गा साठी अति महत्त्वाचा आणि धार्मिक प्रेमी भरलेला सण नऊ दिवसाचा नऊ रंगात मिसळलेला सण म्हणजेच नवरात्र उत्सव
शारदीय नवरात्रीचे आपल्याकडे प्रत्येक सण आणि उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात. वर्षभरात नवरात्री मराठी माहिती असणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे तीन वेळा नवरात्र साजरी करण्यता येते. पण शारदीय नवरात्रीचे महत्व आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरंतर आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत चार महिने अर्थात चतुर्मासात आपल्याकडे अनेक व्रत आणि सण साजरे होत असतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे शारदीय नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी नवरात्रौत्सव सुरू होत आहे अर्थात घटस्थापनेच्या माध्यमातून नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते. तर काही जण नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करतात. हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. त्याशिवाय या नऊ
दिवसात नऊ रंगाचे कपडेही परिधान करण्यात येतात. नवरात्रीच्या शुभेच्छा ही देण्यात येतात. या दिवसांचे नक्की महत्त्व काय
शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात शरद ऋतूमध्ये येते. ही नवरात्र शरद ऋतूत येते, त्यामुळे यास शारदीय नवरात्र म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार, देवी दुर्गेने जगाच्या कल्याणासाठी शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांत महिषासुराशी युद्ध केले आणि विजयादशमीला त्याचा वध करून भक्तांचे रक्षण केले.
स्त्रीची भक्ती यातूनच निर्माण होते ती एक आगळीवेगळी शक्ती आणि या शक्तीच्याच माध्यमातून रूप निर्माण होते नऊ रात्रीच्या नऊ देवींचे मग कधी ती आदिशक्ती होते तर कधी आधी माया तर कधी अंबाबाई अशा अनेक रूपामध्ये ती वर्गाची प्रचिती आहे आणि त्याच अनुषंगाने कुणबी समाज भिवंडी शहर आपल्या समाजाच्या माता-भगिनींसाठी एक व्यासपीठ निर्माण करताना नवरात्री उत्सवाची संकल्पना आणि त्यातून सामाजिक कार्यप्रणालीची जपवणूक सकाळच्या वेळेला ओरडली यायचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करायची आणि संध्याकाळच्या वेळेला प्रत्येक आईच्या देवळामध्ये जाऊन नऊ दिवसाची प्रार्थना यासाठी करायची की घरातील निरोगी आणि सुदृढ आयुष्य तसेच मुला बाळांच्या शैक्षणिक कार्यामध्ये कोणताही अडथळा न निर्माण न होता सर्व जीवन आणि जीवन कार्य प्रणाली सुस्थितीत कौटुंबिक कार्यप्रणाली सालावी यासाठी नऊ दिवसाचे महात्म्य लक्षात घेऊन नऊ दिवसाचे उपवास काही स्त्रिया तर नऊ दिवस पायामध्ये वाण सुध्दा घालत नाही सर्वात कडक उपासना म्हणजे नवरात्रीचे उपासना म्हणून पाहिली जाते आणि या सर्व कार्य प्रणालीच्या माध्यमातून कुणबी समाज भिवंडी शहरातर्फे नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरबा नृत्य करमणुकीच्या माध्यमातून कुणबी समाज भवन येथे आयोजन करण्यात येते यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजाच्या महिलावर्ग सहभागी होऊन आनंद आणि उत्साहामध्ये नवरात्री उत्सव साजरा करतात