कुणबी समाजातिल महिलांसाठी गणेशोत्सवा निमित्त मंगला गौरीचे आयोजन
01/09/2024
मंगला गौरीचे प्राथमिक महत्त्व म्हणजे वैवाहिक सुख, आनंद आणि समृद्धीसाठी देवीचा आदर करणे आणि आशीर्वाद घेणे
मानला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला जास्त महत्व आहे. श्रावणात सातही वारांना महत्व आहेत. या पवित्र महिन्याची वाट वर्षभर पाहिली जाते. श्रावण महिना नवविवाहीतांसाठी खास असतो. तसं वर्षभर नवीन लग्न झालेल्या मुलीचं कौतुक केलं जातं. पण, श्रावण महिन्यात नव विवाहित मुली आपल्या माहेरी जाऊन मंगळागौरीचं व्रत करतात. यावर्षी श्रावण महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळागौरी पूजनाला सुरुवात झाली आहे. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशिर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती. तिचं पूजन केलं जातं. महिलांसाठी हा सण खास असतो. लग्नानंतर सलग 5 वर्षे मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. मंगळागौरीला महिला एकत्र येत नवविवा कोडकौतुक करण्यासाठी विविध खेळ, गाणी, फुगडी घालू आनंद साजरा करतात. त्यामुळे महिलांनाही रोजच्या कामांमधून थोडासा विरंगुळा मिळतो.
मंगळागौरीचे महात्म्य फार जुन्या काळापासून आणि संस्कृतीनुसार आहे कारण की ज्या मुलींची लग्न होतात त्या मुली सासरी जातात आणि सासरी गेल्यानंतर जीवन कार्य प्रणाली मधून थोडा वेळ मिळावा म्हणून माहेरच्या आठवणी ज्या मनामध्ये साठवलेल्या किंवा आनंद उपभोगण्याचा असतो तो फार वेगळा असतो आणि मग त्यामध्ये मंगळागौरीच्या माध्यमातून जुन्या मैत्रिणींच्या भेटीसाठी लहानपणीच बालपण आणि त्या बालपणाला उजाळा देणार आहे त्या मैत्रिणी शाळा आणि शाळेतील मजा महाविद्यालय आणि महाविद्यालयातील मजा सांस्कृतिक कार्यक्रम जसे की गणेशोत्सव दीपावली या सणातील आठवणी या सगळ्यांचे माहेरघर करून एक सण निर्माण झाला तो म्हणजे मंगळागौर आणि या मंगळागौरीचे औषध घेऊन भिवंडीतील माता भगिनी यांच्यासाठी कुणबी समाज भिवंडी शहरातर्फे सालाबाद प्रमाणे मंगळागौर कार्यक्रम स्वर्गीय यमुनाबाई गोपाल भेरे सभागृह कुणबी भवन येथे संपन्न केला जातो त्यावेळी विविध प्रकारचे खेळ खेळले जातात फुगडी, आट्यापाट्या, झिम्मा, या सर्व
मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ
वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा - इत्यादी. असे साधारणत*१५ ते २० *प्रकारचे खेळ यात खेळले जातात.
खेळांचा मनमुराद आनंद माता-भगिनी या एकत्र कमीत कमी 150 ते 200 महिला मंगळागौरी कार्यक्रमाचा आनंद घेताना एक सामाजिक संस्कृतिक चे दर्शन या माध्यमातून पाहण्यास मिळते आणि सर्व माता-भगिनी एकत्र येऊन आपली सुखदुःख चर्चेच्या माध्यमातून आनंदीबाई सोहळा संपन्न होताना दिसतो या मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे आयोजनाचे अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाचे पहिले नियोजन होते आणि नियोजनाच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सामाजिक एकोपा वाढीस व सामाजिक कार्यप्रणाली मजबूत व्हावी या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.