कुणबी समाजा तर्फ़े घरगुती गणेशोत्सवा स्पर्धा २०२४ चे आयोजन

28/09/2024

कुणबी समाज भिवंडीशहरा तर्फे सामाजिक कार्य प्रणालीच्या माध्यमातून आणि समाज सलोखा सुदृढ आणि सशक्त व्हावा या अनुषंगाने आपल्या सर्वांचे आवडते दैवत गणपती बाप्पा याच्या आगमना नंतर घरातील वातावरण आणि निसर्गामध्ये झालेला बदल या अनुषंगाने कुणबी समाज भिवंडी शहराने एक संकल्पना हातात घेऊन गणपती बाप्पांच्या आरस किंवा डेकोरेशन आणि मूर्ती मधील कुशलता आणि मूर्ती मधील रेखीव काम या अनुषंगाने कुणबी समाज भिवंडी शहराचे अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळांनी एक खास बैठक घेऊन सर्व समाज बांधव आणि माता भगिनी यांना आव्हान करण्यात आले होते कुणबी समाज व्हाट्सअप ग्रुप वर आपल्या गणेशाचे, तसेच डेकोरेशनचे, आपल्या कुटुंबासोबत छायाचित्र सेंड करण्याबाबतच्या सूचना कुणबी समाज ग्रुप वर देण्यात आल्या होत्या गेल्या वर्षी घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून काही समाज बांधवांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता त्यामध्ये विशेष उल्लेखनीय असे कामात घर येतील श्री राजू घडसे परिवार यांनी या उपक्रमाबाबत बद्दल अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाचे विशेष कौतुक केले होते तसेच इतर समाज बांधवांनी सुद्धा एक सुज्ञ असा उपक्रम आपण राबवत आहात आणि यापुढेही आपण राबवत राहा असे बरेचश्या समाज बांधवांकडून सूचना आल्या आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येक वर्षाला गणेशोत्सवाच्या दरम्यान आपल्या कुणबी समाज बांधव आणि माता भगिनी यांना आव्हान करण्यात येईल आणि त्यानुसार आपण जास्तीत जास्त सदर कार्य प्रणालीचा भाग होऊन आपल्या निवासस्थानी भेट देऊन आणि आपले कुणबी समाजाचे सन्मानचिन्ह देऊन संपूर्ण कुटुंबाला सन्मानित करण्यात येईल या कार्यप्रणाली मागचा हेतू एकच बुद्धीचे जनक म्हणून ज्यांना आपण पुजतो कोणतीही शुभ कार्य असल्यानंतर प्रथम त्या गणेशाची पूजा केली जाते आणि त्या पूजेच्या माध्यमातून शुभ कार्य घडले जाते व अशा उपक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी आणि सलोखा राखण्याचा प्रयत्न अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाचा असतो आपल्या समाजातील सर्व समाज बांधवांना याद्वारे आव्हान करण्यात येते की येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेऊन आणि सामाजिक बांधिलकीचा विचार करून देखावे निर्माण करावे जेणेकरून आपल्या समाजाची कार्यप्रणाली आणि कार्यात आपल्या कळत नकळत सहभाग होईल सदर उपक्रमास आपण भरघोस प्रतिसाद देऊन अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाला सहकार्य करावे

Scroll to Top