स्वप्न पुर्ती असा कुणबी समाज भिवंडी शहराच्या वातानुकुलीत सभागृहाचा लोकार्पण सोहळा
04/11/2023
कुणबी समाज भिवंडी शहर एक सामाजिक कार्य प्रणालीच्या माध्यमातून आणि समाजा बद्दलचे असता मनात ठेवून आपल्या समाजाचे दानशूर व्यक्तिमत्व स्व. श्री. रामचंद्र काळू जुमारे एक समाज बांधिलकीच्या भावनेतून आपल्या समाजाचे संपूर्ण निर्माण व्हावी अशी महत्वकांक्षा मनात ठेवून आपल्या कुणबी समाज समाज बांधव यांना एका व्यासपीठावर येण्यासाठी सदरची मालकीची जागा सन १९३२ रोजी पासून समर्पित करून त्यांच्या दस्तऐवज कागद पत्रावरून असे लक्षात येत आहे आणि त्यानंतर कुणबी समाज भिवंडी शहराच्या समाज कार्य प्रणाली सुरुवात झाली सन १९६२ रोजी कुणबी समाज भिवंडी शहर म्हणून सरकारी दप्तरी याची नोंद झाली आणि त्या वेळचे कुणबी समाज भिवंडी शहराचे पहिले अध्यक्ष म्हणून स्व श्री. पांडुरंग आनाजी वेखंडे यांनी १९६२ ला आपल्या कुणबी समाजकार्य प्रणालीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
आजपर्यंत कुणबी समाज भिवंडी शहराचे एकूण ९ अध्यक्ष कुणबी समाज भिवंडी शहरासाठी लाभले पहिल्या अध्यक्ष पासून ते नव्या अध्यक्ष पर्यंत सर्वांनी आपापल्या कार्यप्रणाली मध्ये आपल्या कुणबी समाज भिवंडी शहरासाठी अमूल्य योगदान देऊन आज कुणबी समाज भिवंडी शहर वटवृक्षांमध्ये रूपांतर होऊन याच वडाच्या पारंब्या नवीन अध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या माध्यमातून आणि जुन्या ज्येष्ठ समाज बांधवांच्या पावलावर पाऊल ठेवून काहीतरी मोठे योगदान करण्यामागचं प्रयत्न हा तुमच्या आशीर्वादाने आम्हा सर्वांना लागेल यातील मात्र शंका नाही.
कुणबी समाज भिवंडी शहराचे तिसऱ्या मजल्यावर मोकळ्या जागेमध्ये आताच्या वटवृक्षात निर्माण झालेला कुणबी समाज भिवंडी शहर याच्यासाठी एक संकल्पनेच्या माध्यमातून आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून काहीतरी नवीन करण्याचे संकल्पना मनात ठेवून एक स्वप्नपूर्ती म्हणून इतर समाजांच्या सभागृहांचे अवचित लक्षात घेऊन आपल्या कुणबी समाज भिवंडी शहराचे वातानुकूलित सभागृह असावे आणि त्याचा फायदा सर्व समाज बांधव आणि समाजातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून कुणबी समाज भवन येथे तिसऱ्या मजल्यावर स्व श्री. रामचंद्र काळू जुमारे यांची कन्या स्व. यमुनाबाई भोपाल भेरे यांच्या नावाने सदर नवीन सभागृहाचे नामकरण करण्यात आले आणि आज त्या सभागृहामध्ये कुणबी समाज भिवंडी शहराच्या समाज बांधवांना लोकार्पण करून एक हक्काचे आणि शांतमय वातावरणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनाचा केले जाते आणि त्याचा आनंद सर्व कुणबी समाज आनंद घेताना पूर्वजांनी केलेल्या श्रमाचे आज सोने होते असे प्रकरणी दिसून येत आहे या सभागृहाच्या निर्मितीसाठी सर्व समाज बांधव आणि सर्व माझी अध्यक्ष कुणबी समाज भिवंडी शहर यांचे शतशः आभार मानून पुढील सामाजिक कार्य प्रणाली साठी अध्यक्ष आणि माझे कार्यकारी मंडळास आपले सहकार्य अपेक्षित आहे आपल्या सहकार्याशिवाय कोणतेही कार्य शक्य नाही त्यामुळे समाज काय आणि घर काय यासाठी मोठ्यां थोरांचा आशीर्वाद असाच लाभो ही नम्र विनंती.