सालाबाद प्रमाणे कुणबी समाजा तर्फ़े दिवाली पहाटचे आयोजन
13/11/2023
सन दिव्यांचा आपुलकीचा सण प्रेमाचा सण म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते ते जपण्याच्या माध्यमातून कुणबी समाजाच्या तिने एक विशेष आगळावेगळा कार्यक्रम दीपावली पहाटच्या आयोजन केले जाते सन २०२३ रोजी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे गाजंगी सभागृह कोबड पाडा येते संपन्न झाला सदर दिवाळी पहाटच्या माध्यमातून आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून बळी पहाट या कार्यक्रमाचे दीपावली पहाटच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन अती सुंदर प्रकारे करण्यात आली होते. कुणबी समाज भिवंडी शहर आणि सर्व समाज बांधव आहे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दीपावली पहाट कार्यक्रमाला रंग भरला होता दीपावली पहाट च्या माध्यमातून कुणबी समाज बांधव यांनी बळी राजा पहाट या या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन आणि सदर कार्यक्रमांमध्ये भुमिका करणारे सर्व कुणबी समाज बांधव होते.
या बळी पार्टीच्या माध्यमातून बळीराजा आणि शेतकरी यांची कार्यप्रणाली यात एकरूप होऊन कुणबी म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी अशी समाजाशी निगडित जीवन कार्य प्रणालीवर आणि दीपावली पहाट मंत्रमुग्ध दीड ते दोन तासाचा और कार्यक्रमाचे आयोजन होते तसेच दीपावलीच्या सणाच्या माध्यमातून भेटवस्तू देण्याचा एक प्रयत्न म्हणून एक भव्य दिव्य बक्षिसांचे कुपनच्या माध्यमातून ज्याचा क्रमांक निघेल त्या व्यक्तीला सदरची दीपावली भेट ही देण्यात येत होती. यामागील कार्यक्रमाचा हेतू एकच आहे समाज एकत्रित आणि संघटित आणि त्यातून समाज प्रबोधन करण्याचा हेतू हा असून यावर्षीही सालाबाद प्रमाणे आपण आपले कुणबी समाज भवन येतील स्वर्गीय यमुनाबाई भोपाल फेरे सभागृहात दीपावलीचे अवचित लक्षात घेऊन दुसरा दीपावली पहाटचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भावगीत आणि भक्ती गीत आणि जुन्या गाण्यांचा तसेच लहान मुलांच्या विविध वेशभूषा या सांस्कृतिक कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले होते.
सदरच्या कार्यक्रमाला कुणबी समाज माता भगिनी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती नोंदवली होती आणि तसेच हिंदी समाज बांधव ज्येष्ठ समाज बांधव यांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती सदर कार्यक्रमाला आपल्या काही समाज बांधव आणि माता भगिनी यांनी काही गाणी आणि आपल्यातली कुशालता ही स्वतः गाऊन सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले गेले होते असाच सहवास आणि आयोजन आणि नियोजन सुंदर रित्या केले गेले असे बऱ्याच अंशी समाज बांधव यांनी मत व्यक्त करताना सदर कार्यक्रमांमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना बोलून दाखवले त्यामुळे सदर कार्यक्रमाला एक नवीन संजीवनी प्राप्त होऊन कार्यकारी मंडळाला पुन्हा काहीतरी नवीन करण्याचा मानस मनामध्ये येत असते आणि यातूनच पुन्हा नव्याने येणाऱ्या नवीन वर्षामध्ये उत्सव नात्यांचा उत्सव परंपरेचा आणि उत्सव दिव्यांचा म्हणून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि सदर कार्यक्रमाला कुणबी समाज भिवंडी शहर समाज बांधव यांचा मोठ्या प्रमाणात आपल्याकडून भरघोस प्रतिसाद प्रतिसाद मिळतो त्यामुळे मी अध्यक्ष व माझे सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्यावतीने मी आपले मनःपूर्वक आभार मानतो.