सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारीत एक अंकी नाटक मि सावित्रीबाई बोलते
23/01/2024
अखंड महाराष्ट्राच्या राजमाता जिजाऊ माँसाहेब ज्यांच्या पेरणी मधून आणि विचारसरणी मधून स्वराज्याचे मंगल तोरण कसे बांधले जाईल त्यांची संकल्पनेतून स्वराज्य हे सुंदर राज्य कसे होईल की या राज्यामध्ये गरीब जनता निर्भयपणे आपली उपजीविका आणि आपली जीवन कार्यप्रणाली जगेन कारण की मुघलांच्या बलाढ्य साम्राज्याला कशाप्रकारे सुरू लागेल आणि बलाढ्य मुगल कशा पद्धतीने रसातळाला जातील हद्दपार होती असे सतत मनामध्ये विचाराची धारणा आणि संकल्पना मनात ठेवून एक अशीच किरण जन्माला आला आणि त्यातूनच जिजाऊंनी ठरवलं की येणाऱ्या अपत्याकडून आपण स्वराज्याचे तोरण उभारण्या कामी एक लढवय्ये नेतृत्व आपण येणाऱ्या बाळाच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी अर्पण करू आणि देवाच्या मनातही तेच होते आणि तसेच झाले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिजाऊंच्या पोटी जन्म घेतला आणि कुठेतरी सूर्य उदयाला सुरुवात झाली लहानपणापासूनच सर्व प्रकारची कार्यप्रणाली सर्व प्रकारची युद्ध प्रणाली सर्व प्रकारची विचारप्रणाली मनामध्ये ठेवून राजांची नवनिर्मिती करून महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला एक लढवय्ये नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून प्राप्त झाले आणि त्याचे श्रेय सर्वश्री जिजाऊ मासाहेब यांना जात.
तसेच आजच्या कार्यक्रमाचे दुसरे थोर व्यक्तिमत्व का ज्यांनी मुलींसाठी सर्वप्रथम पुणे येथील भिडे वाडा या ठिकाणी मुलींसाठी शाळा सुरू करण्याचे मानस मनात ठेवून त्याची उभारणी झाली आणि शाळेला सुरुवात झाली सर्वप्रथम दोन वर्ग हे सदर ठिकाणी मुलींच्या शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर महिलांसाठी आणि महिलांच्या इतर सामाजिक प्रश्नांसाठी ज्यांनी समाजकंटकांनी दिलेल्या त्रासातून मागे पुढे न पाहता आपल्या मनामध्ये जी संकल्पना आहे ती ठोकणे मांडण्याचा प्रयत्न सावित्रीबाईंनी केला.
आज दिनांक 23.024 रोजी या दोन महान व्यक्तिमत्व मासाहेब जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीच्या माध्यमातून आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून कुणबी समाज भिवंडी शहर यांनी जयंतीच्या माध्यमातून भिवंडी शहरामध्ये प्रथमच सावित्रीमाईंच्या जीवनावर आधारित एक पात्री प्रयोग याचे प्रयोजन कुणबी समाज भिवंडी शहराचे इमारती स्वर्गीय यमुनाबाई गोपाल भेरे सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले या एकपत्री प्रयोगाचे नाव मी सावित्री बोलते सदर एकपात्री प्रयोगाच्या सर्व सर्वा कल्पना आणि कलाकार अँड साधनाताई भेरे ह्या खास वेळात वेळ काढून कोणतीही शुल्क न घेता फक्त समाज प्रबोधनाचा वसा मनात बाळगून जास्तीत जास्त महिलांपर्यंत सावित्री आईची कार्यप्रणाली आणि त्यावेळी कोणत्या कोणत्या गोष्टीला सामोरे कशा कशा पद्धतीने गेले हे निव्वळ जिवंतपणा हा त्या ठिकाणी त्यांच्या नाट्य पात्रातून दिसून येत होता आणि समस्त कुणबी समाज भिवंडी शहराच्या महिलावर्गांनी शांतचित्ताने प्रत्येक संवाद आणि त्या संवादाचा अर्थ हा मनामध्ये कुठेतरी घर करून जात होता आणि अँड साधनाताई भेरे यांनी सदर भूमिका करताना त्या प्रत्यक्ष सदर भूमिकेमध्ये उतरल्या होत्या आणि असे जाणून येत होते की खरोखरच समोर सावित्री आई आपल्याला काहीतरी उपदेश करते आणि त्यांनी घेतलेल्या परिश्रमातून आत्ताच्या तुम्ही स्त्रियांनी जी प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचा वाटा हा न्यू व सावित्रीमाई मुळे आहे. आपली जबाबदारी आणि आपला समाज आणि त्यातून आपल्या समाजाचे प्रबोधन हे कशाप्रकारे केले पाहिजे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कलाकार अँड साधनाताई भेरे यांनी साकारलेल्या मी सावित्री बोलते या एकपात्री प्रयोगाचे सर्व श्रेय मी अध्यक्ष आणि कार्यकारणी मंडळाच्या वतीने त्यांना देऊ इच्छितो आणि त्यांनी यापुढे असे समाज प्रबोधन करून त्यांच्या समाज प्रबोधनासाठी कुणबी समाज भिवंडी शहराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.