चर्चासत्र - २०२४ संपन्न

24/02/2024

*कुणबी समाज भिवंडी शहर तर्फे कार्यकारणी मंडळावर अंकुश राहावा तुम्ही समाजातर्फे जे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले जाते जसे की शिवजयंती, दीपावली पहाट , समाजातील विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव तसेच शालेय चीज वस्तूंचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन, गुढीपाडव्या निमित्त सेल्फी पॉईंट आयोजन, आपल्या कुणबी समाजाची दिनदर्शिकेचे प्रकाशन, हिवाळी सहल , दसरा संमेलन, इतर अनेक असे कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाच्या वतीने केले जाते परंतु आणि त्यावर नियंत्रण तसेच कुणबी समाज भिवंडी शहराचे ज्येष्ठ समाज बांधव यांना सदर चर्चा सत्रासाठी आमंत्रित करण्यात येतं आणि अध्यक्षांनी कार्यकारी मंडळाचे वतीने सेक्रेटरी वार्षिक कार्यक्रमाचे वाचन केल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपले मत किंवा अभिप्राय लिखित नवीन विषय समाज हितार्थ सुचवण्याची संकल्पना करण्यात येते जसे की कार्यकारणी जे वार्षिक कार्यक्रम राबवते याबद्दलचा आपला अभिप्राय देण्यात यावा असे चर्चासत्रात सुचित करण्यात येते यासाठी नमुना अर्ज प्रत्येक चर्चासत्रात उपस्थित समाज बांधवांना दिले जाते आणि त्यामध्ये कुणबी समाज भिवंडी शहराचे कार्यकारीणी च्या चाललेल्या कामासंदर्भामध्ये आपलं लिखित मत किंवा नवीन संकल्पना मांडण्यासाठी एक व्यासपीठ या माध्यमातून निर्माण करण्यात येते कारण की समाज कार्य हे सार्वजनिक कार्य असल्यामुळे समाजातील सर्व समाज बांधवांना आपल्या सूचना किंवा अभिप्राय कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये देण्याची नक्कीच मुभा आहे सन 2024 या वर्षी सदर चर्चासत्रेचे आयोजन स्वर्गीय यमुनाबाई गोपाल भेरे सभागृह कुणबी भवन येथे आयोजित करण्यात आले होते. अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ ज्येष्ठ समाज बांधव यांचा चांगला प्रतिसाद लाभला चर्चासत्रामधून सर्व ज्येष्ठ समाज बांधवांनी आपल्या अभिप्राय मध्ये कुणबी समाज कार्यकारिणी सुंदर रित्या काम करत आहे आणि यापुढेही आपण यापेक्षा सुंदर काम करण्याचे आयोजन आपल्या स्तरावर करण्यात यावे तसेच काही समाजबांधवांनी लिखित सूचना सुधा केल्या अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये सदरच्या सूचना ठेवण्यात आल्या होत्या त्यानुसार त्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन अध्यक्ष व कार्यकारिणी त्यावर योग्य ती अंमलबजावणी करेल या चर्चासत्रेचं आयोजन फक्त वडीलधाऱ्या माणसांचा आपल्या समाजकार्य प्रणालीमध्ये एक अनुभवचा वाटा असतो आणि त्या अनुभवाच्या वाट्या मधून कार्यकारी मंडळाला समाजासाठी नाविन्यपूर्ण नवीन पद्धतीने काहीतरी काम करण्याची इच्छाशक्ती असल्याने अनुभवी व्यक्तिमत्त्वाकडून असे चांगले अभिप्राय प्राप्त झाले आणि त्यातून कार्यकारी मंडळावर ज्येष्ठांचा अंकुश राहावा हा या चर्चासत्रेचा मूळ भाग आहे यापुढे चर्चा सत्राचे आयोजन नवीन वर्षांनुसार दरवर्षी केले जाईल असे कार्यप्रणाली मंडळांने बैठकीमध्ये ठरविण्यात आले आहे*

Scroll to Top